राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड शहरातील शुक्रवार पेठ येथे २, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट येथे १, वाखाण रोड येथे १ याचबरोबर मलकापूरमधील लक्ष्मीनगर व आगाशिवनगर येथे प्रत्येकी १, आणि सैदापूर येथे १ असे एकूण ७ नागरी आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत.
कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला त्यांची नोंद घेत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा शासकीय खर्चाने मिळण्यासाठी आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज होती या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड, मलकापूर व सैदापूर येथे ७ नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना आरोग्य सुविधा देताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती. असलेली यंत्रणा अपुरी पडत होती. अश्या परिस्थितीत प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, वेळोवेळी बेड वाढविले गेले व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला. आरोग्य केंद्रे वाढविली पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करीत कराड दक्षिण मध्ये नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करून आणली. हि नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले. हे नागरी आरोग्य केंद्र सुरु करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती यांच्या समन्वयाने स्वतःच्या मालकीची जागा किंवा कमाल मासिक रु. १५,०००/- पर्यंत भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. सदर नागरी आरोग्य केंद्रासाठी १५०० ते २५०० sq ft इमारत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा, शौचालय, वीज याची उपलब्धता आहे तसेच या नागरी आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), औषध निर्माता, स्टाफ नर्स, शिपाई या पदांची नियुक्ती केली जाणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोग्य सुविधा वाढविण्यावर असलेल्या धोरणांमुळे कराड दक्षिण मधील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
याबरोबरच कराड तालुक्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल... त्यासाठी काय करावे लागेल याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी तालुक्यातील सर्व तरुण-तरुणींची आपण मुख्यमंत्री होता