मुसळधार पाऊस ; कोयना धरणाचे दरवाजे आज दुपारी उचलणार
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Published:Sep 13, 2022 04:57 AM | Updated:Sep 13, 2022 04:57 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने आज दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:00 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 12891 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 13941 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.