‘मराठा क्रांती मोर्चा’ने विविध मागण्यांसाठी आज राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना निवेदन दिले आहे.
फलटण : ‘मराठा क्रांती मोर्चा’ने विविध मागण्यांसाठी आज राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, यामध्ये सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, कोपर्डीच्या नराधमांना ताबडतोब फाशी देण्यात यावी, समाजासाठी ज्या युवकांनी आपले जीवन संपवले त्यांच्या कुटुंबाला दिलेली आश्वासने पूर्ण करावी, सारथी संस्थेच्या माध्यमातून मदत करावी, शिवस्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना आर्थिक सहकार्य मिळावे या व अशा अनेक मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्यावतीने राज्य सरकारकडे निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणाचा प्रश्नात राज्य सरकारने योग्य त्या पद्धतीने वेळोवेळी बैठका घेऊन आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच वकिलांची फौज तयार करून जे-जे अडथळे येतील ते दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कोपर्डी सारखी घटना पुन्हा तांबडी बुद्रुक येथे घडली असून, त्या नराधमांना कडक शासन करावे व या पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी कठोरात कठोर शिक्षा या नराधमांना द्यावी, म्हणजे असे कृत्य करण्याचे धाडस झाले नाही, पाहिजे असे सांगण्यात आले आहे.
जगाला आदर्श ठरलेले 58 मोर्चे महाराष्ट्रात विविध ठिकाणी निघाले. मात्र, कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही. याचा एक मोठा आदर्श निर्माण करणार्या मराठा समाजाला कोणी डीवचू नये व आमच्या भगिनींना त्रास देऊ नये अन्यथा वेळ पडली तर कायदा हातात घेऊ; पण अशा नराधमांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.