गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
निढळ : गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेकांनी शेतात कांदा काढून ठेवला आहे. तो झाकण्यासाठी शेतकर्यांची पळापळ झाली. हवामान खात्याने दिलेला हवामानाचा अंदाज अचूक ठरला आहे. ऐन हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे थंड हवामानातही प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे लहान मुले, वृद्ध या हवामानामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे दिवसभर ज्येष्ठ नागरिकांनी घरी राहणे पसंत केले.
हवामान सतत बदलत आहे. शेती व्यवसाय या बदलत्या हवामानामुळे संकटात आला आहे. नेमका पीक काढणीला पाऊस येत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. अशा नैसर्गिक संकट प्रसंगी सर्वांनी शेतकर्यांना मदत करायला हवी. असे नैसर्गिक संकट येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.असे नेरचे बागायतदार शेतकरी गणेश बनकर यांनी सांगितले.