पाटण तालुक्यात मनसेचा लवकरचं खळखट्याळ
News By : Muktagiri Web Team
पाटण/प्रतिनिधी : पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार, पाटण पोलीस स्टेशन, नगरपंचायत पाटण यांना देण्यात आले आहे* मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत, त्यामुळे ते फलक सर्वोच्च न्यायालयाचे आदेशा प्रमाणे मराठी भाषेमध्ये लावावे याबाबत चे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे. लवकरात लवकर हे इंग्रजी भाषेतले फलक मराठी मध्ये लावले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टायलने आंदोलन करेल आणि होणाऱ्या संघर्षाला सदरचे दुकानदार व प्रशासन जबाबदार राहील. आठ दिवसात जर दुकानांचे नामफलक जर मराठी भाषेत झाले नाही तर मनसे तालुक्यात खळखट्याळ करणार असा इशारा तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिला आहे. प्रशासनाला निवेदन देताना पाटण तालुका अध्यक्ष श्री गोरख नारकर, तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ, अंकुश कापसे, नेरळे विभाग अध्यक्ष राम माने,मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार, हेळवाक विभाग अध्यक्ष समर्थ चव्हाण, मनसैनिक अनिकेत भोमकर यांच्या सह समस्त तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....