कराडात युवकावर धारदार शस्त्राने वार
Published:4 y 11 m 1 d 16 hrs 7 min 23 sec ago | Updated:4 y 11 m 1 d 15 hrs 43 min 21 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड, ः शहरातील कृष्णा नका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान जखमेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुंधवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, असे उपजिल्हा रूग्णालयातील विद्याकीय सुत्रांनी सांगितले. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, मिलिंद शिंदे हा युवक अंगावरती रक्त सांडलेल्या अवस्थेत व कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्याने पळत सुटला. हा काय प्रकार आहे म्हणून लोकांनी गर्दी केली असता त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समजली. यामध्ये त्याच्या मानेवर जबर जखम झाल्याने त्याला कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले आहे. याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील , गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याच्यावर हल्ला कोणी केला. त्यामागचे कारण काय होते. याची ओळख अद्याप पटलेली नव्हती. पांढरीच्या मारूती चोकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हल्ला करणारे कोण होते, याची पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होते.