देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटक
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 7 ः आगाशिवनगर ता. कराड येथील इमर्सन कंपनी जवळ देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरता आलेल्या एकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस असा एकूण 60 हजार 200 रुपयेंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29, आगाशिवनगर मलकापूर, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील अवैध शस्त्रे शोधून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की आगाशिवनगर इमर्सन कंपनी जवळ एक संशयित देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकास माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आगाशिवनगर इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचून लवराज दुर्गवळे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे मॅक्झिनसह पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 60 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गर्दशनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अझरुद्दीन शेख, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, सोनाली पिसाळ यांनी केली.