खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर फलटणमध्ये उभारणार 75 बेड्सचे कोरोना सेंटर

भाजपा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांची माहिती 
Published:4 y 6 m 19 hrs 16 min 39 sec ago | Updated:4 y 6 m 19 hrs 16 min 39 sec ago
News By : Muktagiri Web Team
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर फलटणमध्ये उभारणार 75 बेड्सचे कोरोना सेंटर

‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वखर्चाने फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे 75 बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत,’ अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.