शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यांचा निषेध

सचिन झांजुर्णे : पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी
Published:Mar 17, 2021 01:19 PM | Updated:Mar 17, 2021 01:19 PM
News By : Muktagiri Web Team
शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यांचा निषेध

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकार्‍यांची वागणूक उर्मट असून पदाधिकार्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार या शिवसैनिकांवरती जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून जनतेसाठी झटणार्‍या शिवसैनिकांना न्याय द्यावा,