कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णाचा नावलौकिक देशात : डॉ. अतुल भोसले
News By : Muktagiri Web Team
कराड, : कृष्णा परिवारातील कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे संबंध हे नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलचा नावलौकिक देशात झाला आहे, असे गौरवोद्गार कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी काढले. संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांचा डॉ. भोसले यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी ३५ वर्षांपूर्वी कृष्णा हॉस्पिटलची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच परिसरातील लोकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अतिशय खडतर प्रवासातून आज ही संस्था एवढी मोठी झाली असून, यामध्ये कर्मचारी वर्गाची साथ मोलाची राहिलेली आहे. डॉ. सुरेशबाबांच्या मार्गदर्शनाखाली आज संस्था यशस्वी वाटचाल करत असून, कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यात योगदान द्यावे. डॉ. भोसले यांच्या हस्ते कृष्णा विश्व विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी विलास चव्हाण, माधव कणसे, विनायक पवार, शरणाप्पा कोरी, सौ. नीलम पाटील, बाळासाहेब काळे, भास्कर मोहिते, सौ. ताहेराबी मुल्ला, प्रमोद पावले, सौ. लता झगडे, लियाकत आंबेकरी, दत्तात्रय राऊत, आप्पासो माळी, जगन्नाथ ताटे, दिलीप जावरे, भगवान काळुखे, कुबेर भोसले, लक्ष्मण पाटील, नेताजी बल्लाळ, सुनील सगरे, शिवाजी पाटील, अशोक कांबळे, सौ. कांताबाई पवार, बाळू येडगे, श्रीमती शैला देशपांडे, सौ. नम्रता पवार, श्रीमती शारदा येडगे व सौ. राजश्री वायदंडे या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनिमित्त शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी सौ. शैलजा पाटील, निवास मोरे, अजित गायकवाड, किरण पवेकर यांच्यासह रेडिओलॉजी, हाऊसकिपींग व सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनीस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, अस्मिता देशपांडे आदी मान्यवरांसह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.