‘सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण ही आवश्यक असल्याने, हे ज्ञानार्जन व ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त असल्याचे महत्त्व डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पटवून दिले आहे,’ असे मत प्राचार्य युवराज गोंडे यांनी व्यक्त केले.
पिंपोडे बुद्रुक : ‘सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण ही आवश्यक असल्याने, हे ज्ञानार्जन व ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त असल्याचे महत्त्व डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पटवून दिले आहे,’ असे मत प्राचार्य युवराज गोंडे यांनी व्यक्त केले.
वाघोलीच्या स्व. शंकरराव जगताप महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. रंगनाथन यांचा जन्मदिवस हाच सर्वत्र ग्रंथपाल दिन म्हणून केला जातो. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, त्याकरिता ग्रंथालयाचा विकास, प्रसार होऊन देशांतील सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची कवाडे खुली करून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे विचार ग्रंथपाल प्रा. प्रवीणकुमार कुंभार यांनी व्यक्त केले.
यावेळी लिपिक सागर काटकर, ग्रंथपाल सहायक शिवाजी नावडकर व महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.