अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तब्बल २५ वर्षांनी एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या आठवणी सांगितल्या, अनेकांची केलेल्या स्ट्रगलचे वर्णन करताना उपस्थिती मित्रांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. प्रत्येकवर्षी असाच कार्यक्रम घेवून हा संघच कॉलेजचा माजी विद्यार्थी संघ म्हणून रजीस्ट्रेशन करण्याची जबाबदारी यावेळी अवधूत कलबुर्गी यांच्याकडे देण्यावर एखमत झाले. त्याला महाविद्यालयानेही सहमती दिली.
कराड : वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या १९९६-९७ च्या मराठी माध्यमाच्या अखेरच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षानी घेतलेल्या गेट टुगदेरच्या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची घोषणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. वेणूताई चव्हाण महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून तब्बल २५ वर्षांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्या प. ता. थोरात, माजी प्रचार्य बी. ए. कालेकर, विद्यमान प्राचार्य एल. बी. जाधव, प्रा. सुनील फलटणकर, प्रा. व्ही. व्ही जगदाळे, प्रा. बी. जाधव, प्रा. घोरपडे, प्रा. सौ. नागरे-पाटील, जिवाजी कांबळे, तानाजी काटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चालेल्या कार्यक्रमात अनेकविध कार्यक्रमांचे आय़ोजन केले होते. मृत झालेल्यांना श्रध्दांजली, गुरूजनांचा सत्कार ते फनी गेम्सही आयोजीत केल्या होत्या. सुरूवातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्री. पाटील म्हणाले, तब्बल २५ वर्षानंतर एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह फारच चांगला आहे. त्यांनी पुढाकार घेवून घेतलेल्या या अनोख्या कारर्यक्रमामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. शक्यतो गेट टुगेदर बाहेर होते. मात्र आपण खास महाविद्यालयात आयोजीत केलेल्या कार्यक्रमामुळे कॉलेजचाही सन्मान झाला आहे. मराठी माध्यमाच्या बॅचचच्या निमित्ताने कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघाची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, संस्था संस्था हवी ती मदत करण्यास तयार आहे. यावेळी प्रचार्य थोरात, प्राचार्य कालेकर, प्राचार्य जाधव, प्रा. फलटणकर, इंद्रजीत पाटील, सौ. दीपाली देवकर यांची मनोगते झाली. यावेळी दिवसभर फनी गेम्स झाल्या, त्यासोबत मीमीक्रीचाही कार्यक्रम पार पडला. अबुबकर सुरात यांनी सुत्रसंचालन केले. फारूक शेख यांच्या गाण्यांचा कार्यक्रम केला.अवधूत कलबुर्गी यांनी प्रास्ताविक केले. श्री. भोईटे यांनी मीमीक्री सादर केली. महेश कुंभार यांनी आभार मानले.