कराड तालुक्यातील कोतवालपदाच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत
News By : कराड | संदीप चेणगे
कराड, ः कराड तालुक्यामध्ये 76 सजे मंजूर असून एका सजास एक कोतवाल याप्रमाणे सद्यस्थितीत 57 कोतवाल पदे प्रत्यक्षात कार्यरत आहेत. तर 19 सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत. या रिक्त सजांची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हातील “कोतवाल“ संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरणेबाबत सुधारीत कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार कराड तालुक्यामध्ये एकुण 76 सजे मंजुर असुन “एका सजास एक कोतवाल“ या प्रमाणे फक्त 57 कोतवाल पदे प्रत्यक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील पुढील 19 सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत. यामध्ये कालगांव, कोपर्डे हवेली, चिखली, निगडी, मरळी, वसंतगड, वारुंजी, विंग, शेरे, काले, पोतले, गोटे, आटके, आणे, इंदोली, किवळ, मलकापुर, वाघेरी व साजुर या सजांचा समावेश आहे. या सजाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 14) सकाळी 11.00 वाजता काढणेत येणार आहे. त्यानुसार संबंधित सजाचे आरक्षण सोडतीसाठी वर नमुद केलेल्या सजातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच संबंधित ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार तथा कोतवाल निवड समितीचे सदस्य सचिव विजय पवार यांनी केले आहे.