ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर नागरीकांनी करावा नागरीकांनी घाबरून न जाता ग्रामसुरक्षा यंत्रेणेचा प्रभावीपणे वापर करावा यामुळे एका वेळेस संपूर्ण गाव जागे होऊ शकते आणि चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसू शकतो आणि चोरट्यांना पायबंद बसू शकतो अशोक हुलगे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठार पोलीस स्टेशन.
आसनगाव : उत्तर कोरेगाव परिसरातील आसनगावमधील हेमंत शिंदे व महादेव शिंदे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोइंडा (कुलूप) तोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडली आहेत .मात्र या घरफोडीत चोरट्यांच्या हाती भोपळा लागला असून यामध्ये कोणतेही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना रविवारी ता.११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उत्तर कोरेगाव परीसरातील आसनगावातील हेमंत शिंदे व महादेव शिंदे यांच्या बंद घराच्या कोइंडा (कुलूप) तोडून आतमध्ये प्रवेश केला हेमंत शिंदे यांच्या घरामधील कपाट व महादेव शिंदे यांच्या घरातील कपाट,बेड व इतर ठिकाणी चोरट्यांनी झाडाझडती घेतली मात्र या दोन्ही बंद घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.चोरट्यांनी घरफोडी करताना घरासमोर असलेल्या दुचाकींचे प्लग काढले व शेजारील घरांना बाहेरून कडी लावली असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. चोरट्यांनी केलेल्या या घरफोड्यांनमुळे नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले