शॉर्टसर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
कराड तालुक्यातील चचेगाव येथील घटना
Published:Nov 07, 2022 04:06 PM | Updated:Nov 07, 2022 04:06 PM
News By : मलकापूर I सुनिल परिट
कराड तालुक्यातील चचेगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तब्बल 15 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये चचेगाव मधील नऊ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा नावाच्या शिवारात सोमवारी दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने उसाला आग लागली.. याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला मात्र वीज वितरण अधिकाऱ्यांची केवळ टोलवाटोलवी पहायला मिळाली.. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागलेली ही आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत गेली आणि देशपांडा शिवारातील तब्बल 15 एकरातील ऊस या भीषण आगीने गिळंकृत केला या भीषण आगीत विलास भीमराव पवार संजय पवार अनिल पवार नानासो पवार महादेव पवार संभाजी पवार यांच्यासह नऊ शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदरच्या ऊसाची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे