मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी, मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा बचावली आहे.
मायणी : मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी, मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा बचावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मायणी-म्हसवड रोड लगतच्या बाजूस असलेल्या वनक्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच येथे पानझडती वनस्पती आहेत. त्याच ठिकाणी उभा असलेल्या विद्युत खांबावरून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवारी (दि. 1) सकाळी अकराच्या सुमारास या वनक्षेत्राला आग लागली.
ही माहिती येथील वनरक्षक संजीवनी खाडे यांना समजताच त्यांनी वन कर्मचार्यांना व मायणी गावातील पत्रकारांना याची माहिती दिली. यावेळी त्वरित सोशल मीडियाच्या माध्यमातून मायणी परिसरातील लोकांना याची मेसेजद्वारे माहिती मिळताच मायणी गावचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, वनरक्षक पी. बी. पारधी, वनरक्षक के. डी. मुंडे, पत्रकार पोपट मिंड, महेश तारळेकर यांच्यासह श्रीकांत सुरमुख, सुशांत कोळी, सूरज खांडेकर, धनंजय लिपारे, संदीप लुकडे आदी युवकांनी व मायणी ग्रामपंचायत कर्मचारी आणि वन कर्मचार्यांनी एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणल्याने मायणीची वनसंपदा वाचवण्यात यश आले.
यावेळी पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी अनिल कचरे यांचा माती टाकण्यासाठी जेसीबी व रस्ता कॉन्ट्रॅक्टर यांनी पाण्याचा टँकर आग आटोक्यात आणण्यासाठी देण्याची विनंती केली. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आली.
मायणी वनक्षेत्राला आग लागल्याचा मला वैयक्तिक मेसेज आला, तो मी कन्फर्म करून लगेच 1926 ला डायल करून वन विभागाच्या पोर्टलवर या घटनेची नोंद केली.
- विजय झोडगे, क्लार्क, वनविभाग, कोल्हापूर.
गतवर्ष वगळता दरवर्षी शॉर्ट सर्किट अथवा अन्य कारणाने मायणी वनक्षेत्रास आग लागण्याच्या घटना घडत असतात. आजही या घटनेची तातडीने दखल घेतल्याने शेकडो एकरमधील हा वन्यपरिसर आगीपासून बचावला आहे. वनविभाग, पत्रकार, ग्रामस्थांच्या सतर्कतेने याठिकाणची आग, वणवा विझविण्यात यश येते. परंतु, वनक्षेत्रात येणार्या वीज खांबांच्या भोवती जाळ पट्टे आखले तर दरवर्षी होणार्या घटना थांबण्यास मदत होईल व वनपरिसर व त्यातील शेकडो कीटकजीव प्राणी बचावतील.
- प्रशांत कोळी, पोलीस पाटील, मायणी.