‘कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत. त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे,’ असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.
मायणी : ‘कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत. त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे,’ असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.
येथील मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्ट, यशश्री महिला बचत गट, मायणी मेडिकल असोसिएशन आणि डॉ. दिलीपराव येळगावकर मित्रमंडळ यांच्यावतीने मायणीत ऑक्सिजन सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
या वेळी तहसीलदार अर्चना पाटील, डॉ. दिलीपराव येळगावकर, सचिन गुदगे, सपोनि मालोजीराजे देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, उपसरपंच आनंदा शेवाळे, ट्रस्टचे उपाध्यक्ष व ग्रा. पं. सदस्य विजय कवडे, सचिव रवींद्र बाबर, मायणी मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी म्हणाल्या, ‘दररोज वाढणार्या कोरोना संख्येचे नियोजन कसे करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. अनेक संस्थेकडून कोरोना सेंटर उभे राहत आहेत. पण डॉक्टर कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिकमध्ये कॉलसेंटर सुरू केल्यास त्या सर्व प्रकारे शासन मदत करेल. सध्या वेळेवर बेड न मिळाल्याने तसेच केवळ ऑक्सिजन बेड तातडीने उपलब्ध न झाल्याने तडफडून प्राण जाणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी मायणी येथील संस्था, मित्रमंडळांनी एकत्र येऊन उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरंच कौतुकास्पद आहे.’
येथील मेडिकल असोसिएशनने केलेले कार्य समाजपयोगी असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुरूकमाने व तलाठी शंकर चाटे, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले, ‘सर्वसामान्य गरीब कार्यकर्ता हीच माझी दौलत आहे. त्यांच्या जीवावर मी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सर्वसामान्यांचे प्राण ऑक्सिजन अभावी जाऊ नयेत म्हणून हा उपक्रम घेतला आहे. हा उपक्रम येथून पुढे प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी येथे सुरू राहील तसेच याकामी काही निधी उपलब्ध करून दिला जाईल. या ऑक्सिजन सेंटरचा लाभ मायणी व परिसरातील 15 ते 20 गावांना अशा सूचनाही डॉ. तुरुकमाने यांना दिल्या.’
या सेंटरसाठी माजी आ. प्रभाकर घार्गे, नंदकुमार मोरे, पं. स. सदस्या मेघाताई पुकळे, जगदीश कदम, मा. इं. ढाळे या मान्यवरांनी ऑक्सिजन मशीन स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहे.
तहसीलदार अर्चना पाटील म्हणाल्या, कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पडळ, गुरसाळे याठिकाणी नवीन सेंटर सुरू करीत आहोत. खटाव येथे 125 बेड, औंध येथे 50 बेडचे सेंटर सुरू केले आहे, असे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सरपंच सचिन गुदगे यांनी मायणीत कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन येथील कर्मचारी मेडिकल कॉलेजवर काम करतात, त्यांच्यासाठी व मायणीतील लोकांसाठी बेड आरक्षित करावे, याची मागणी केली.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास माजी उपसरपंच सूरज पाटील, पोलीस पाटील प्रशांत कोळी, उर्मिला येळगावकर, ग्रामपंचायत सदस्य विजय देशमुख, जगन्नाथ भिसे, नितीन झोडगे, डॉ. मकरंद तोरो, डॉ. विकास देशमुख, डॉ. सूर्यकांत कुंभार, डॉ. दत्तात्रय तांबवेकर, डॉ. अमोल चोथे, डॉ. उदय माळी, सर्व पत्रकारांसह यशश्री महिला बचत गटाच्या प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
राज संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुशील तुरकमाने यांनी आभार मानले.