कामगार हा बांधकाम व्यवसायाचा कणा असून, कामगारांच्या प्रती ऋण म्हणून त्याच्या पाल्यांसाठी चड उखढ हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केल्यास त्याला मदत करण्याची भूमिका बिल्डर्स असोसिएशन घेणार आहे. दरम्यान, याद्वारे यावर्षी किमान 50 कामगारांच्या पाल्यांचे प्रशिक्षणासाठी मदत करणार असल्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी सांगितले.
फलटण : कामगार हा बांधकाम व्यवसायाचा कणा असून, कामगारांच्या प्रती ऋण म्हणून त्याच्या पाल्यांसाठी चड उखढ हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केल्यास त्याला मदत करण्याची भूमिका बिल्डर्स असोसिएशन घेणार आहे. दरम्यान, याद्वारे यावर्षी किमान 50 कामगारांच्या पाल्यांचे प्रशिक्षणासाठी मदत करणार असल्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी सांगितले.
यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे चेअरमन शफिक मोदी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅाम्प्युटर इन्स्टिट्यूटचे शेखर कांबळे यांच्यामध्ये करार करण्यात आला.
यावेळी कामगार कल्याण मंडळ समन्वयक संदीप कांबळे, बिल्डर्स असोसिएशनचे राज्य खजिनदार किरण दंडिले, अभिजीत इंगळे उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशनकडून जागृती करून बांधकाम कामगारांची नोंदणी करून, विविध योजनांची माहिती पोहोचवून व प्रत्यक्षात मदत करून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केल्याचे फलटण चेअरमन शफिक मोदी यांनी सांगितले.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असून, बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरने पुढाकार घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने यापूर्वी बांधकाम कामगारांचा मोठा मेळावा घेतला होता, याचा परिणाम म्हणून खुप मोठ्या संख्येने कामगारानी नोंदणी केली होती. आज सातारा जिल्ह्यात जवळपास 30,000 नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, असे सांगितले आहे.