‘खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे. खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून खटाव तालुका शिक्षक समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे. खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून खटाव तालुका शिक्षक समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
वडूज येथे शिक्षक संघातून शिक्षक समितीमध्ये प्रवेशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, सांगली जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, विठ्ठल फडतरे, किरण यादव, चंद्रकांत मोरे, तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उदय शिंदे यांनी नितीन खोत यांचा सन्मानपूर्वक प्रवेश करून घेतला. त्यांच्याबद्दल शिंदे म्हणाले, ‘नितीन खोत यांच्यासारखा शिक्षकांमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारा एक हिरा आम्हास गवसला आहे. या हिर्याला पैलू पाडून शिक्षक समितीमध्ये झंझावात निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणार आहे.’
शंकर देवरे म्हणाले, ‘शिक्षक बँकेमध्ये शिक्षक संघाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला वेळोवेळी शिक्षक समितीच्या संचालकांनी विरोध केला असून, बँकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे यावेळी सभासद शिक्षक समितीच्या ताब्यामध्ये बँक देतील,’ असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सागर माने, नितीन खोत यांचेही मनोगत झाले. त्यांनी आपल्या मनोगतात बोलताना ते शिक्षक संघातील ठोकशाहीला शिक्षक समिती लोकशाहीने नक्कीच पराभूत करेल, असे सांगितले
या कार्यक्रमास सांगली प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब आडके, कांत फडतरे, एस. के. जाधव, विश्वंभर रणनवरे, संजय दिडके, जयप्रकाश साबळे, विजय गोरे, विजय गुरव, दिलीप पवार, दीपकराव घनवट, रामराव कदम, शिवनाथ लखापते, वैभव जगताप, सागर माने, किरण गोडसे, संग्राम गोसावी, सोमनाथ पाटोळे, नितीन घनवट, राजेंद्र बागल, पोपटराव माळवे, उमेश पाटील, सचिन गाढवे, किसन मगर, गायकवाड, नंदराज हडसर, विशाल देशमुख, धर्माजी इंगळे, रवींद्रकुमार पवार, संजय माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विठ्ठल फडतरे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी आभार मानले.