कराडमधील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी तिघे संशयित ताब्यात
खुन्नस दिल्याच्या कारणावरून खून
Published:Dec 15, 2020 12:05 PM | Updated:Dec 15, 2020 12:10 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः बाराडबरे परिसरात खुन्नसने बघण्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन आहेत. तिघांकडे चौकशी सुरू आहे. आदित्य गौतम बनसोडे रा. बाराडबरे परिसर कराड या युवकाचा सोमवारी खून झाला होता. आदित्यची त्याच परिसरातील काही युवकांशी खुन्नस होती. याची परिणीती सोमवारी खुनाच्या घटनेत झाल्याचे तपासात समोर येत आहे. खून करून पळालेल्या तिघा संशयितांच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील होते. पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संशयितांच्या शोधात होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने तिघा संशयितांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले. तिनही संशयित अकरावीत शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी प्रार्थमिक चौकशी केली. पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील पुढील तपास करत आहेत.