महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.
म्हासुर्णे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, सुरेश पाटील, अनिल माने, बाळराजे भोसले, महेश पाटील, रावसाहेब माने, छन्नूसिंग पाटील, संतोष घार्गे, नंदकुमार सोलापुरे, दत्तात्रय रुद्रुके, जलसंपदा विभागाचे उपकार्यकरी अभियंता व्ही. एम. बनसोडे, शाखा अभियंता डी. बी. गुळीग, शाखा अभियंता एस. डी.चव्हाण आदी उपस्थित होते.
पारगाव गावाच्या शेतीला वरदान ठरलेला तलावात उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ना. बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांमुळे जलसंपदा विभागाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे या गावाला उन्हाळ्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
हा तलाव परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम या धरणात पाणी सोडले होते. तेव्हापासून परिसरातील शेती हिरवीगार होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर या तलावात पाणी सोडल्याने या तलावालगत असलेल्या पुसेसावळी व राजाचे कुर्ले या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना ही चांगल्या प्रकारे पाण्याचा उद्भव होणार असल्यामुळे या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे.