चाफळ येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
संशयित पोलिसात हजर ः भरदिवसा घडलेल्या थरार नाट्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण
Published:Sep 23, 2021 10:50 AM | Updated:Sep 23, 2021 10:50 AM
News By : Muktagiri Web Team
चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणार्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्हाही कबूल केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. मल्हारपेठ पोलिस घटनास्थळी पोचले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैतन्या हिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्याची काही दिवसांपूर्वी चाफळनजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेत व चैतन्य एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तीला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसापूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. अनिकेत आजही चाफळा दुचाकीवरून आला होता. येथील स्वागत कमानीजवळ तो चैतन्याला भेटला. त्यांच्यात काही बेलणे होण्यापूर्वीच त्याने तीचा तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. सकाळी दहाच्या सुमारास थरार नाट्य घडले. त्यामुळे ग्रामस्थांत धावपळ उडाली. भर चौकात झालेल्या थरार नाट्यामुळे ग्रामस्थांत घबराट पसरलीय. खुनानंतर सशयित अनिकेत पोलिसांत हजर झाला आहे. त्यावेळी पोलिसांनी खुनाची माहिती समजली. त्यांचीही धावपळ उडाली. त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून कर्हाडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तेथे पोलिसांनी पंचानामा करण्यास सुरवात केली होती.