सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.
कुमठे : सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.
बाबुलाल लुणिया अनेक वर्षांपासून साखळी पुलानजीक चप्पल-बूट विक्रीचा व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद आहे. शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास अचानक या दुकानातून आगीच्या ज्वाळा बाहेर दिसू लागल्यानंतर नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली.
नगरपंचायतीच्या पाण्याच्या टँकरमुळे आग वेळीच आटोक्यात आली. आगीत दुकानातील सर्व सााहित्य जळून खाक झाले. या दुकानाशेजारी अन्य चार ते पाच दुकाने आहेत, ती सुदैवाने वाचली.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.