‘सध्या फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, ही बाब चिंता व्यक्त करणारी असतानाच मात्र ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन निवारण समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचे काम व्यवस्थितरीत्या सुरू आहे. गोखळी गावच्या कोरोना समितीने केलेले उल्लेखनीय काम असून, ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
आसू : ‘सध्या फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, ही बाब चिंता व्यक्त करणारी असतानाच मात्र ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन निवारण समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचे काम व्यवस्थितरीत्या सुरू आहे. गोखळी गावच्या कोरोना समितीने केलेले उल्लेखनीय काम असून, ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
गोखळी, ता. फलटण येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील हनुमान मुखी मंदिरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी गोखळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, जिल्हा पाणीपुरवठा समिती सदस्य विश्वासराव गावडे, सोसायटीचे चेअरमन तानाजी गावडे, माजी सरपंच रमेश गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे, उपसरपंच राधेश्याम जाधव, ग्रामपंचायत सदस्य शांताराम गावडे, डॉ. गणेश गावडे, सागर गावडे, तलाठी गायकवाड, ग्राम विस्तार अधिकारी गणेश दडस, गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शेख, परिचारिका लोंढे तसेच गोखळी गावातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
फलटण पूर्वभागातील गोखळी हे गाव दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असल्याने गोखळी ग्रामपंचायत व समितीने केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. कोरोनाचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. आरोग्याविषयी काही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले.
फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात असणार्या नागरिकांनी आजारी असताना शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये गेले असता जर तुम्हाला आजार असतील त्याचबरोबर सर्दी, खोकला असेल व त्या आजाराबाबतची दक्षता संबंधित डॉक्टरांनी घेतली नाही तर थेट माझ्याशी संपर्क करा. जो डॉक्टर असे काम करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आ. दीपक चव्हाण यांनी दिला.
गोखळी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे व त्यांच्या युवा ब्रिगेडने कोरोनामध्ये केलेले काम हे उल्लेखनीय आहेच; शिवाय तालुक्यातील एकमेव गाव आहे की काय समस्या आहे, हे विचारल्यानंतर समस्या नाहीत, असे उत्तर देणारे एकमेव गाव आहे. त्यामुळे गोखळीतील युवा सदस्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेणे गरजेचे आहे, असेही मत आ. चव्हाण यांनी व्यक्त केले.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे यांनी सांगितले की, फलटण-बारामती तालुक्यांच्या सीमा जोडणार्या भागात ग्रामपंचायत सदस्यांनी व पोलीस पाटलांनी केलेलं काम तसेच आरोग्य सेविकांनी व अशा स्वयंसेवकांनी नियोजन बद्ध केलेल्या कामामुळे आम्ही व्यवस्थितरीत्या काम करू शकलो. त्यामुळे आम्हाला राजकीय त्रास झाला; पण सर्वसामान्यांनी खूप मोठी ताकद दिल्याने आमची कमिटी काम करण्यामध्ये यशस्वी झाली, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचार्यांचा खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, आशा, आरोग्य सेविका, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ग्राम विस्तार अधिकारी गणेश दडस यांनी आभार मानले.
योग्य व्यक्तीचा सन्मान..
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आलेला ‘कोरोना योद्धा’ हा पुरस्कार मनोजतात्या गावडे यांना मिळाल्याने त्यांच्याबरोबर काम करणार्यांना मोठी ताकद व प्रेरणा मिळणार आहे. पत्रकार संघाने खरोखर योग्य व्यक्तीची निवड केल्याने पत्रकार संघाचे यावेळी त्यांनी आभार मानले. पत्रकार संघाने योग्य व्यक्तीचा केलेला सन्मान त्यांना प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे मत आ. चव्हाण यांनी व्यक्त केले.