शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी नं. 1 शाळेचे उपक्रमशील शिक्षक सागर जाधव यांचा प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
दहिवडी : शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी नं. 1 शाळेचे उपक्रमशील शिक्षक सागर जाधव यांचा प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने महाराष्ट्रभर गेले अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करून प्रेरणा देण्याचे कार्य सुरू आहे. या संस्थेने विविध सामाजिक उपक्रम जसे पूरग्रस्त मदत, कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी, गडकिल्ले संवर्धन, चारा छावणी मदत, वृक्षारोपण, गरजूंना अन्नधान्य वाटप, गरीब होतकरू विद्यार्थी मदत, विद्यार्थी दत्तक योजना तसेच प्राथमिक शिक्षण क्षेत्रात शाळा व समाज जोडणारे विविध उपक्रम राबवून अमूल्य कामगिरी केल्याबद्दल सागर जाधव यांचा डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
त्यांनी कारगिल विजय दिवस, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा प्रवेश दिन, पोलीस हुतात्मा दिन, दहिवडी बाजार पटांगणावर बालबाजार, टपाल दिन, स्वच्छ सर्वेक्षण, वृक्षारोपण तसेच कल्याणी कृषी व सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शाळेस भौतिक सुविधांची पूर्ती, वारकरी दिंडीस पिण्याच्या पाण्याची सोय आणि महिमानगड फाउंडेशनच्या माध्यमातून गडकिल्ले संवर्धन, किल्ल्यावर स्वातंत्र्यकाळानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण असे नानाविध आदी उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबविले आहेत. या सन्मानाबद्दल विविध स्तरांवरून त्यांचे कौतुक होत आहे.