सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.
सातारा : सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एकता लेडीज वेअर, अप्सरा साडी सेंटर आणि पंकज क्रिएशन या दुकानांच्या मालकांवर कोवीड-19 अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, रविवारी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि शितोळे व मोहन लक्ष्मण पवार, पोना कुंभार, पांढरपट्टे पेट्रोलिंग सातारा शहरात करत होते. यावेळी भवानीपेठ खणआळी येथे एकता लेडीज वेअर या नावाचे दुकान सुरू असल्याचे दिसले. हे दुकान शंकर वासुदेव लालवाणी वय 54 वर्षे रा. प्रतापगंजपेठ सातारा यांचे असल्याची माहिती मिळाली. तसेच दुकानात ग्राहक वसीम अन्वर मुल्ला वय 33 वर्षे रा. शनिवारपेठ सातारा व रुक्सार आझाद खान वय -27 वर्षे रा -272 शनिवारपेठ सातारा उपस्थित होते.
तसेच 12.25 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना 35 सदाशिवपेठ सातारा येथील अप्सरा साडी सेंटर दुकान सुरू असल्याचे दिसले. दुकान मालक यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पुरुषोत्तम लाहोटी वय 60 रा. सदाशिवपेठ सातारा सांगितले. त्यांच्या दुकानातील गिर्हाईक पोलीस पाहताच पसार झाले.
त्यानंतर पोलिसांना पंकज क्रिएशन दुकान सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दुकान मालकांना नाव गाव विचारले असता त्यांनी पंकज हरीनाम लाहोटी वय 40 शनिवारपेठ सातारा असे सांगितले. दुकानात दौलत गुलाब सय्यद -60 वर्षे रा -19 दुर्गापेठ सातारा, शशिकांत तुकाराम वाघमळे वय 50 वर्षे रा. कण्हेर ता. सातारा, दिपाली पांडुरंग सावंत वय -35 वर्षे रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव ग्राहक म्हणून उपस्थित होते.
या सर्व दुकानमालकांनी पुर्वपरवानगी न घेता दुकाने चालु ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.