कराडमध्ये डॉ. शिंदे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा
वाखाण परिसरातील शिंदेमळा येथील घटना
Published:Jul 10, 2023 08:50 AM | Updated:Jul 10, 2023 08:50 AM
News By : Muktagiri Web Team
कराड शहर परिसरातील शिंदे मळा येथे मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरानी शिंदे डॉक्टर यांच्या घरावर दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कराड येथील बारा डबरी परिसरात शिंदे डॉक्टर हे वास्तव्यास आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी शिंदे डॉक्टर यांच्या घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेने कराड शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत.