अधिवेशन काळात किंवा संपल्यावर धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक लावण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरणाच्या मंजूरीबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोयनेत सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या आंदोलनाची चर्चा झाली. लवकरच अधिवेशन संपल्यानंतर किंवा शक्य झाल्यास अधिवेशन काळात कोयनेसह इतर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या बाबत मीटिंग लावू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली . दरम्यान आज गुरूवार दिनांक 2 रोजी बोंडारवाडी धरणाच्या मंजूरीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली, मिटींग नंतर कोयनानगर येथे सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्तांचे दि 27 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे, आपल्या कार्यकाळात निर्णय झाले होते, नंतर ते उलटे सुलटे झाले, धरणग्रस्तांना उद्ध्वस्त करणारे दोन जिआर निघाले आहेत, ते रद्द झाले पाहिजेत यासाठी यावरसुद्धा लवकरच मिटींग लागली पाहीजे,कशाला लोकांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देताय असे आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, यावर सुरू असलेल्या याअधिवेशना दरम्यान किंवा अधिवेशन संपताच कोयनेसह इतर धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर मंत्रालयात निश्चित बैठक लावू अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान दिली असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान आंदोलनाच्या बुधवारी तिसऱ्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या व्यथा एकूण आपण कोयनेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले नंतर खासदार भोसले यांनी डॉ भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करून शासनाशी झालेल्या पत्रव्यवहार ,आदी कागदपत्रे मागवून घेत येत्या 4, 5 तारखेला आपण मुंबईत जाऊन स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून कोयनेच्या प्रश्नांवर तातडीने मिटींग लावण्याच्या सुचना करणार असल्याचे खासदार भोसले यांनी सांगितले असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे . दरम्यान श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली कोयनानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन गुरुवारी 4 थ्या दिवशीही सुरूच राहील, दिवंसेदिवस या आंदोलनात धरणग्रस्तांची संख्या वाढत चालली असून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार धरणग्रस्तांनी केला असल्याचे दिसत आहे.