छगन भुजबळांनी मुक्ताफळे उधळणे थांबवावे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मराठा आरक्षणाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये
Published:Nov 28, 2023 07:08 PM | Updated:Nov 28, 2023 07:08 PM
News By : कराड | संदीप चेणगे
छगन भुजबळांनी मुक्ताफळे उधळणे थांबवावे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची पिछेहाट आमचे सरकार असते ते तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यार बोलताना  विखे-पाटील म्हणाले, दुर्दैवाने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पिछेहाट, वाताहातला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आघाडीचे सरकार गेले आहे. त्यांनी सरकार घालवण्याचे काम केले आहे. त्यांची सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे यात काही तथ्य नाही.