गोवा बनावटीची दारू वाहतुकप्रकरणी दोघांना अटक
News By : Muktagiri Web Team
कराड, दि. 22 ः राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू वाहतुक करणार्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. त्याच्याकडून विदेशी दारूचे 110 बॉक्स, दोन मोबाईल व दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 17 लाख 37 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजय वसंत कुळधरण (वय 28), साहिल रामदास धात्रक (वय 20 दोघेही रा. पिंपरी लोकैं ता. राहाटा, जि. अहमदनगर) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावरून अवैध दारूची वाहतुक होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नांदलापूर येथे सापळा लावला. त्यावेळी महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी अडवून त्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये विक्रीसाठी आणलेली गोवा बनावटीच्या दारूची 110 बॉक्स मिळून आले. सदरचे वाहन दोन मोबाईल व बोलेरो पिकअप गाडी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरचे उपआयुक्त विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यक निरीक्षक विनोद शिंदे, दुय्यक निरीक्षक पी. व्ही. नागरगोजे, सहाय्यक दुय्यक निरीक्षक पी. आर. गायकवाड, जवान विनोद बनसोडे यांनी केली. अधिक तपास दुय्यक निरीक्षक विनोद शिंदे करीत आहेत.