येथील कला-वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मराठी विषयात एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
मायणी : येथील कला-वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मराठी विषयात एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी डॉ. मिरजकर यांनी अस्वस्थ शहराच्या कविता, शिवाजी मिथक व वास्तव, सूत्रसंचालन एक प्रयत्नसाध्य कला, आई एक साठवण, वाचकांची निवडक पत्रे (संपादित) अशी पुस्तके लिहून साहित्यिक योगदान दिले आहे. याशिवाय ‘संत नामदेवांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना संशोधन करणार्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाकडून नियुक्ती देण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा प्रज्ञासूर्य ग्रंथालय व पत्रकारांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कारास उत्तर देताना डॉ. मिरजकर म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठामार्फत एम.फिल व पीएच.डी.च्या संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मिळालेल्या संधीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण दूर होणार आहे.’
यावेळी डॉ. विलास बोधगिरे, लेखक बाळासाहेब कांबळे, पत्रकार महेश तांबवेकर, अंकुश चव्हाण, विशाल चव्हाण, प्रशांत महामुनी आदी उपस्थित होते.
पत्रकार दत्ता कोळी यांनी आभार मानले.