डिस्कळ या गावाला ‘एलआयसी’तर्फे ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतर्गत गावाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणार्या गावाला दिला जातो.
निढळ : डिस्कळ या गावाला ‘एलआयसी’तर्फे ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतर्गत गावाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणार्या गावाला दिला जातो.
हा पुरस्कार ‘एलआयसी’ वडूज शाखेच्या शाखाधिकारी शुभांगी मालवणकर व उपशाखाधिकारी भरत गोडसे यांच्या हस्ते डिस्कळ गावचे सरपंच डॉ. महेश पवार व उपसरपंच संदीप कर्णे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी विकास अधिकारी सुधाकर चिखलीकर व राजेश काळे यांनी विम्याचे महत्त्व सांगितले.आयुर्विमा हा प्रत्येकाचा असणे गरजेचे आहे. ‘विमा ग्राम’च्या माध्यमातून विमा प्रतिनिधी आयुर्विमा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात, असे त्यांनी सांगितले.
डिस्कळ गावचे सुपुत्र व एलआयसी कर्मचारी अमृत जंगम यांनी विमा ग्राम संकल्पना समजावून सांगितली.
यावेळी विमा प्रतिनिधी प्रशांत शिपटे, अरविंद कदम, संतोष देशमुख, प्रसाद पतके, मधुरा पिसाळ, ज्ञानेश्वर जगताप, विलास कुलकर्णी व डिस्कळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच डॉ. महेश पवार यांनी ‘एलआयसी’च्या ‘विमा ग्राम’ उपक्रमाचे कौतुक केले व डिस्कळ गावाला दरवर्षी विमा ग्राम करण्यासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे वचन दिले.
संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत शिपटे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद कदम यांनी आभार मानले.