खटाव तालुक्यातील सुमारे 38 रुग्णांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री यापैकी तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आठ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या राजाचे कुर्ले येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख यांनी दिली.
वडूज : खटाव तालुक्यातील सुमारे 38 रुग्णांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री यापैकी तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आठ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या राजाचे कुर्ले येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी खटाव तालुक्यात विशेषत: वडूज परिसरात कोरोनाने चांगलाच कहर केला होता. यामध्ये 25 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण केले होते. यापैकी 30 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.
यामध्ये पुसेगाव येथील दहा, वाकेश्वर येथील अकरा तर वडूज, मायणी येथील रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जाखणगाव येथे आरोग्य विभाग व कोरोना समितीने घेतलेल्या दक्षतेमुळे अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही. जायगाव येथील पुरुष रुग्ण गुरुवारी पॉझिटिव्ह सापडला होता. जायगाव ऐवजी जाखणगाव असा उल्लेख झाल्याने जाखणगाव परिसरात उलट-सुलट चर्चा झाली.
‘त्या’ युवतीचा कापड दुकानाशी संबंध नाही
वडूज येथील पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेली एक युवती कापड दुकानातील कामगार आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, संबंधित युवतीचा शहरातील कोणत्याही कापड दुकानाशी कसलाही संबंध नाही. तर ‘त्या’ युवतीची आई दुसर्या एका खत दुकानदाराच्या घराचे घरकाम करत होती. त्यामुळे आईच्या संपर्कामुळे सदरची युवती बाधित झाल्याचे समजते.