डोंगरानजीक उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले
वनवासमाची येथील घटना ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Published:2 y 9 hrs 13 min 36 sec ago | Updated:2 y 9 hrs 13 min 36 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड : कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरानजीक असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले आढळून आले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्राणी मित्र सुरेश पवार यांना माहिती दिली. पवार यांनी वन विभागाला माहिती दिली असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी वनवास माची येथे डोंगरा नजीक असणाऱ्या उसाच्या शेतात संबंधित शेतकरी कामानिमित्त गेले असता त्यांना तीन बिबट्यांची पिल्ले आढळून आली. पिल्ले पाहिल्यानंतर त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. याच परिसरामध्ये पिल्लांची आई सुद्धा असणार आहे. त्यामुळे त्यांनी तेथून बाजूला जाऊन याबाबतची माहिती प्राणिमित्र सुरेश पवार यांना दिली. पवार यांनी वनविभागाच्या माहिती वनविभागास दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.