कराड भागातील शेतकरी हा क्रांतिकारक विचाराचा आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकरी 3500 उसाचा दर घेत असेल तर आपला शेतकरीही मागे राहणार नाही त्याला सुद्धा असाच उसाचा भाव मिळवून द्यायचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी गट तट पक्ष विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. - सचिन नलावडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रयत क्रांति संघटना
कराड : यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना दिले आहे गेल्या एक वर्षभरापासून बाजारपेठेमध्ये साखरेचे दर 36 रुपये च्या आसपास स्थिर राहिले आहेत व यावर्षी 38 ते 39 रुपये साखरेला भाव मिळत आहे तसेच साखर कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती डिसलरी अल्कोहोल असे द्वितीय पदार्थ घेतल्याने त्याचाही फायदा कारखान्यांना झाला आहे माळेगाव व सोमेश्वर या साखर कारखान्यांनी 11.80 उतारा असताना एफआरपी पेक्षा साडेपाचशे ते साडेतीनशे रुपये जास्त दिले आहेत मग जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे तसेच दुधाला सरकारने जाहीर केलेला भाव सध्या मिळत नाही लिटरला पाच ते सात रुपये कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे म्हणून दुधाला 35 रुपये हमीभाव मिळावा ही मागणी सुद्धा या आंदोलनात करण्यात येणार आहे