शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद
News By : Muktagiri Web Team

मुक्तागिरी वृत्तसेवा पुणे : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी यावेळी दमदार झाली. पण त्यानंतर शिवराजने महेंद्रला चीतपट केले आणि महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. शिवराजने सुरुवातीपासून आक्रमकपणा दाखवला, पण महेंद्र त्याचे आक्रमक थोपवत असल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत मातीच्या विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर दमदार विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला महेंद्रने एक गुण मिळवला होता. पण त्यानंतर सिकंदर हा चांगलाच आक्रमक झाला आणि त्याने त्यानंतर सलग दोन गुण पटकावले होते. त्यामुळे ही लढत चांगलीच रंजर झाली होती. पण त्यानंतर या लढतीत सामना सुरु असताना आव्हान देण्यात आले. याआव्हानाचा निकाल यावेळी महेंद्रच्या बाजूने लागला. कारण महेंद्रला या आव्हानानंतर चार गुण मिळाले तर सिकंदरला एकच गुण मिळाला. या लढतीमधील खऱ्या अर्थाने हा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण या आव्हानानंतर महेंद्रचे पाच गुण झाले होते. महेंद्रने त्यानंतर या लढतीत आपली आघाडी कायम ठेवली आणि हा अंतिम सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले. कुस्ती चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. कारण बऱ्याच जणांना सिकंदर ही लढत जिंकेल, असे वाटत होते. पण महेंद्रने दमदार खेळ करत ही अंतिम फेरी जिंकली आणि महाराष्ट्र केसरीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. गादीच्या विभागात शिवराज राक्षेने कमाल केल्याचे पाहायला मिळाले. कारण हर्षवर्धन सदगीर हा नावाजलेला मल्ल होता. पण शिवराजने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्यामुळे शिवराजने या सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. या लढतीत शिवराजने हर्षवर्धनवर ८-१ असा मोठा विजय साकारला आणि त्याने थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. शिवराज आणि हर्षवर्धन हे दोघे मित्र असले तरी कुस्तीच्या मैदानात मात्र त्यांनी चांगलाच व्यावसायिकपणा दाखवला. त्यामुळे या लढतीसाी जेव्हा हे दोघे एकत्र आले तेव्हा ते मित्र नसून दोन कुस्तीपटू असल्याचेच पाहायला मिळाले.