कराड : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कराड पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. कराड २२६ पालिकात अव्वल ठरली असून पालिकेमे पाच कोटींच्या पारितोषिकालाही गवसणी घातली आहे. मुंबईज आज सकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातील पालिका गटात कराड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे पाच कोटींचे बक्षीस पटकावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेशं शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धत गतवर्षी नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. निकाल जाहीर झाल्यानंतर कराड पालिकेत कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.