कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्या असणार्या सुविधांसाठी आमदार फंड
निढळ : कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्या असणार्या सुविधांसाठी आमदार फंड व जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाईल.
कोरोना हे जगावरील संकट आहे. सध्या आलेल्या दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सदरची दुसरी लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार व जिल्हा व आरोग्य प्रशासन सर्व ताकद पणाला लावून तळागाळापर्यंत जाऊन काम करीत आहे. पुसेगावसह उत्तर खटाव तालुक्यातील वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्तरीय कमिटीने सतर्क राहावे, अशा सूचना केल्या.
पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना सेंटरमधील उपचार घेत असणार्या कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधा, औषधोपचार याविषयी माहिती जाणून घेतली. कोरोना सेंटरमधील डॉ. प्रियांका पाटील यांनी रुग्ण व सुविधांविषयी माहिती दिली.
यावेळी माजी उपसभापती संतोष साळुंखे, सरपंच विजय मसणे, ग्रा. पं. सदस्य सुरेश जाधव, गणेश जाधव, विशाल जाधव, सत्यम जाधव, प्रवीण देवकर उपस्थित होते.