संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील नागरिक आणि व्यापार्यांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
म्हासुर्णे : संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील नागरिक आणि व्यापार्यांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
म्हासुर्णे परिसरात मोठी बाजारपेठ व भाजी मंडई यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.ही वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखली नाही तर पुन्हा भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे ओळखून म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते.
म्हासुर्णे व परिसरात दि. 24, 25, 26, 26 एप्रिलला जनता कर्फ्यू जाहीर केला होता. म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटीच्या वतीने दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून जनता कर्फ्यूबाबत जनजागृती केली जात होती. या जनजागृती व आवाहनाचा नागरिकांवर चांगला परिणाम झाल्याने नागरिकांनीही सर्व दुकाने बंद ठेवून ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व बाजारपेठेत व रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता.
ग्रामस्थांनी धोका समजून दिला प्रतिसाद
नागरिकांना भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली. त्याचबरोबर ‘जनता कर्फ्यू’ची आवश्यकता का आहे, हेही समजून सांगितले. तसेच वाढती रुग्णसंख्या ही वेळेत रोखली गेली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. हे येथील जनता व व्यापार्यांनी समजून घेतल्यानेच या ‘जनता कर्फ्यू’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- संभाजी माने, पोलीस पाटील, म्हासुर्णे.