जेजुरी : फुलांनी सजवलेला आकर्षक रथ, खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी त्यातच आई जानाईचा उदो उदो, सदानंदाचा येळकोट गजर करीत तीर्थक्षेत्र जेजुरी तील ग्रामस्थांचा जनसमुदाय आपल्या जानाईदेवी पायी पदयात्रा सोहळ्यास जेजुरी गावाच्या सिमे लगत दौडज खिंडीत मार्गस्थ कऱण्यात आला. रुबाबदार बैलजोडी रथाला पारंपरिक लोकवाद्य साथीला तर भक्तांचा लोकगजर यामुळे ग्रामस्थांनी आणि पायी यात्रा करणाऱ्या भाविकानी सर्व परिसर गजबजून गेला होता. गुलाल भंडाऱ्याची उधळन करीत बैलगाड्यांचा ताफा नागमोडी वाटेने निघाला दीडशे किलोमीटर दूर असलेल्या पाटण तालुक्यातील निवकाने जानाईदेवीच्या यात्रेला पारंपरिक संत नागूमाळी यानी शेकडो वर्षापासून सुरु केलेली हा पायी पालखी सोहळा त्यांचे वंशज नागनाथ झगडे आणि त्यांचा परिवार आजही चालवत आहे तर श्री जानाईदेवी पदयात्रा मंडळाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष हजारो पायी जाणाऱ्या भाविकांना आणि समस्त ग्रामस्थांना आजही मोफत अन्नदान जलपान व्यवस्था अखंड ठेवत आहे जेजुरी येथिल अनेक उद्योजक कारखानदार व्यापारी तसेच मानकरी गावकरी देवसंस्थान बारा बलुतेदार संघ अध्यक्ष सचिन खोमणे आपला सेवाभावी हातभार लावत आहेत यामुळे सर्व अठरा पगड जाती धर्मातील ग्रामस्थ मोठ्या भक्त भावानं यात सामील होताना दिसत आहे जानाईदेवीला वसुंधरा मानून या पायी मार्गावरून जाणार्या पाटणखोऱ्याच्या काऊदरा सडावाघापुर येथे पाटणकर आणि जेजुरीकर निसर्गपुजा करतात.