पाटण :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरू आहे .या पार्श्वभूीवर पोलीस विभागाकडून पाटण तालुकयामधील 3 व्यक्तींना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याबाबत वेगाने चौकशी करून हद्दपारीची कारवाई सुनिल गाढे, उपविभागीय दंडाधिकारी , पाटण उपविभाग पाटण यांनी केली आहे. पाटण तालुक्यामधील 1) सुरज अनिल पाणस्कर, (रा. नारळवाडी, ता. पाटण), 2) मारुती निवृत्ती कदम, (रा. गोकुळ तर्फे हेळवाक, ता. पाटण), 3) अजय सुनिल भिसे, (रा. क्रांतीनगर, नाडे, ता. पाटण), या तीघांवर अनुक्रमे मल्हारपेठ, कोयनानगर व मल्हारपेठ व इतर पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, मारामारी, धमकी देणे, शासकीय कर्मचा-यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करणे इत्यादी असे गुन्हे दाखल आहेत.त्यातील काही गुन्हे न्यायप्रविष्ट असताना पुन्हा नवीन गुन्हे काही व्यक्तीवर दाखल झालेले आहेत.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील यांचे वर्तनात फरक पडलेला नसल्याने पोलीस विभागाकडून शेवटी त्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या तिघा पासुन लोकांच्या मालमत्तेस व जीवितास धोका निर्माण होऊन शांतता व कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची शक्यता तसेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये पाटण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी सदर प्रस्तावांवरुन प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी महारष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56 नुसार या तीघांना पाटण व कराड तालुक्यातुन 3 महीन्यांसाठी हद्दपार केलेले आहे. यामुळे स्थानिकांनी काही काळासाठी का होईना सुटकेचा निःश्वास टाकला आहे.