कार्यक्रमात बोलताना विक्रम पावसकर म्हणाले की महाराष्ट्रातील सगळ्या मतदार संघांपैकी कराड उत्तर मतदारसंघात मनोजदादा घोरपडे यांनी मोठ्या प्रमाणात घरोघरी कमळ हे चिन्ह पोहचवले.आज महात्मा गांधी आणि संग्रामबापू या दोघांचा वाढदिवस आहे.महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते.मात्र संग्रामबापू आपण तसे करायचे नाही. समोरच्याने एक दिली तर आपण खणखणीत दोन द्यायच्या.त्यापन अश्या की समोरचा परत उठला नाही पाहिजे.मागच्या वेळी ज्या काही गोष्टी झाल्या त्या चुका सुधारून मनोजदादांच्याच माध्यमातून कराड उत्तरमध्ये कमळ चिन
कराड : आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सर्वांनी एकत्रित काम करून कराड उत्तरमध्ये येणाऱ्या २०२४ ला कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना माझी पूर्ण ताकद देणार असून स्व.भाऊसाहेब महारांजाच्या विचाराचा वारसा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची संपूर्ण फळी त्यांच्या पाठीशी उभी करू असे प्रतिपादन सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मत्यापुर (ता.सातारा) येथे उद्योग क्षेत्रातील यशस्वी उद्योजक संग्राम घोरपडे (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.महेश शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे,भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर,जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई,शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव,युवा सेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ,रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की,सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेल्या संग्रामबापू घोरपडे यांनी शिक्षण व प्रचंड मेहनत घेऊन उद्योग क्षेत्रात मोठे लौकिक कमावले आहे.संग्रामबापूनी जवळपास १३ उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.मनोजदादा घोरपडे यांनी कराड उत्तरमध्ये खूप काम केले आहे.मागच्या वेळी झालेल्या सर्व गोष्टींचे आपण सर्वच साक्षीदार असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकत्र काम करू असे उद्गारही यावेळी त्यांनी काढले. यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले की मनोजदादा काय किंवा मी काय आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातूनच वर आलेलो आहोत. संघर्ष हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. माजी पालकमंत्र्यानी घोरपडे कुटुंबियांना गेल्या दीड वर्षात जो प्रचंड त्रास दिला त्याची दुप्पट परतफेड करणार असुन मा. मनोजदादा यांना पुढील काळात संपूर्ण ताकद देणार हे आज मी जाहीरपणे सांगतो. कराड उत्तर मध्ये एक एस.टी. रीकामी आहे पण मनोज दादांची एस टी भरलेली आहे. तेव्हा भरलेल्या एस टी. मध्ये बसा असा सल्ला नाव न घेता भाजपा च्या नेत्यांना दिला.ज्यांनी बारामतीकरांचे जोडे उचलले त्यांना कराड उत्तरची सुज्ञ जनता उत्तर देईल.
यावेळी मनोजदादा घोरपडे म्हणाले की साखर कारखान्याच्या माध्यमातून लवकरच १ लाख लिटर क्षमतेची डिस्टलरीचा प्लान्ट उभारण्यात येणार असून रोजगार उपलब्धतेसाठी भागात नवनवीन उद्योग उभारण्यावर भर देणार आहे.संघर्ष हा आम्हाला नेहमीचाच आहे.पण या संघर्षाच्या काळात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. महेश शिंदे यांनी मोलाची मदत केली.ही बाब आम्ही विसरणार नसून बाबाराजे व महेश शिंदे यांच्या सोबत राहूनच यापुढील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार आहे.
यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे,वैभव चव्हाण, महेश जाधव,अनिल देसाई, रामकृष्ण वेताळ संग्राम घोरपडे आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक संग्राम घोरपडे (बापू) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष महेश जाधव,चंद्रकांत मदने,सुरेश पाटील,रणजित माने,शेखर, माने,माजी चेअरमन शंकरराव घोरपडे (काका),विकास गायकवाड,माजी व्हा.चेअरमन विश्वास शेडगे,रमेश कणसे,डॉ.नागेश जाधव, अण्णासाहेब निकम, माधवराव गुरव, सुरेश कुंभार, विक्रम पवार पापा , बजीरंग जाधव, सुभाष शेठ , हिंदुराव ढाणे साहेब, जयवंत जाधव, प्रमोद आप्पा, महेश चव्हाण, धनाजी पाटिल, इस्माईल पटेल, सचिन माने, विश्वास जाधव, शहाजी शेठ काळभोर,तसेच कराड उत्तर मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पं. स.सदस्य संजय घोरपडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वासराव काळभोर यांनी मानले.