फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण शहर व तालुक्यातील रस्ते, पूल, प्रा. शाळा, अंगणवाडी इमारती, अन्य विकास कामे यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून 274 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना ना. रामराजे बोलत होते.
यावेळी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक- निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांची उपस्थित होती.
ना. रामराजे म्हणाले, ‘एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे फलटण-सातारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण 176 कोटी, फलटण शहरातील रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 12 कोटी, ग्रामीण भागातील विविध रस्ते पुलांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदींमधून 63 कोटी, नाबार्ड 26 मधून 4 रस्त्यावरील पुलांसाठी 4 कोटी 91 लाख, स्थानिक विकास निधीतून 7 कोटी 9 लाख, अर्थसंकल्पीय तरतुदी व अन्य योजनांतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग 11 कोटी, दलित वस्ती सुधार योजनेतून 98 लाख असे एकूण 274 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
फलटण-सातारा (आदर्की-मिरगाव-फलटण रा. मा. 149 कि. मी. 0/00 ते 26/400) वाठार निंबाळकर फाटा ते आदर्की फाटा (फौजी ढाबा) हा संपूर्ण रस्ता 10 मीटर रुंदीने सिमेंट काँक्रीटचा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून 176 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नाबार्ड 26 योजनेतून फलटण-आसू-तावशी रस्त्यावर, पिंपळवाडी-फडतरवाडी रस्ता, तरडगाव-सासवड-घाडगेवाडी-माळवाडी रस्ता, पाडेगाव-रावडी-आसू रस्ता या 4 रस्त्यावर पूल बांधणीसाठी 7 कोटी 91 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातील विविध 18 रस्त्यासाठी 63 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तालुक्यातील 21 गावातील दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी 98 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून 12 गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, छोटे पूल बांधकाम, भूमिगत गटार, पेव्हिंग ब्लॉक वगैरे कामे यासाठी 7 कोटी 9 लाख रुपये मंजूर आहेत.
सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विविध कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय तरतूद व अन्य योजनांतून 11 कोटी 1 लाख 33 हजार रुपये मंजूर असून त्यामध्ये खालील कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून 7 लाख रुपये 2 रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मंजूर आहेत, 3054 मार्ग व पूल योजनेतून 2 कोटी 66 लाख 50 हजार रुपये 13 रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
7 गावात नवीन शाळा खोल्या बांधकामासाठी 89 लाख रुपये, 12 गावातील शाळा खोल्या दुरुस्तीसाठी 23 लाख रुपये, 38 गावात अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 3 कोटी 23 लाख रुपये, 3 गावातील अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी 2 लाख 33 हजार रुपये, 7 गावातील ‘क’ वर्ग यात्रा स्थळांच्या ठिकाणी मंदिर व भक्त निवास परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते, भोजन हॉल, किचन हॉल उभारणी वगैरेसाठी 31 लाख रुपये, 12 गावातील नागरी सुविधांसाठी 45 लाख रुपये, 49 गावातील जन सुविधांसाठी 1 कोटी 94 लाख रुपये, पंचायत समिती सेस मधून 22 गावातील विकास कामासाठी 41 लाख 6 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
फलटण शहरातील विविध प्रभागातील 67 रस्त्यांच्या खडीकरण डांबरीकरण कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अनुदान योजनेतून 11 कोटी 79 लाख 90 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.