प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं अपवादात्मक असतात.
निमसोड : प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं अपवादात्मक असतात.
यापैकीच एक आहेत. एनकूळ (ता. खटाव) येथील आरोग्य सहायक छगन शाबू शिंदे. त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीस सुमारे 5 वर्षाचा कालावधी उलटूनसुद्धा त्यांनी कोरोना काळात स्वखर्चाने शेकडो रुमालांचे वाटप केले. याशिवाय भेटेल त्या माणसांची कोरोना संसर्गजन्य आजारासंदर्भात जनजागृती केली. याचबरोबर भित्तीपत्रकांचे व्यावसायिकांना वाटप करणे, वाहन चालक, नागरिकांना मास्क वाटप करणे असे विविध उपक्रम राबविले आहेत.
शिंदे यांनी सेवानिवृत्तीनंतरही जपलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पंचायत समितीच्यावतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्याबद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांच्या हस्ते शिंदे यांना सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी शिंदे यांनी कातरखटाव (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून सेवेत असताना विविध समाज विधायक उपक्रम राबवले होते. या त्यांच्या कार्याचा गौरवप्रसंगी ऊहापोह झाला.