‘सिद्धनाथ विद्यालयाने शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत चांगली प्रगती केली असून, या विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नूतन सदस्य अॅड. किसनराव खामकर यांनी दिली.
निमसोड : ‘सिद्धनाथ विद्यालयाने शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत चांगली प्रगती केली असून, या विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नूतन सदस्य अॅड. किसनराव खामकर यांनी दिली.
खामकर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
सर्जेराव देशमुख यांनी रयत टिंकरिंग लॅबच्या कामासाठी 5 लाख रुपये दिले होते. या कामाचे भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ अॅड. खामकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मणराव लंगडे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच संतोष देशमुख, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्रीकांत मोरे, भास्कर पवार, प्रतापराव घार्गे-देशमुख, अमोल घाडगे, मुख्याध्यापक लंगडे, शिक्षक वर्ग, मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.