पाटण तालुक्यातील सर्व शाळांसाठी वनसंवर्धनदिनानिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धा
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण ः वनसंवर्धनाच्या प्रचार व प्रसारास चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी पाटण तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्वास इन्वायरो, श्वास फौंडेशन इंडिया, कोयना एज्युकेशन सोसायटीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 23 जुलै वनसंवर्धन दिन साजरा करण्यात येतो. वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा दोन गटामध्ये होत आहे. निबंध स्पर्धेसाठी इयत्ता 7 वी व 8 वीच्या गटातील विद्यार्थ्यांसाठी डोंगर बोले ः नका जाळू आम्हास, व जैवविविधता ः वन-वनवा तसेच इयत्ता 9 वी व 10 वीच्या गटातील विद्यार्थ्यांसाठी जळणाऱ्या डोंगराचे आत्मवृत्त व जैवविविधता ः वन-वनवा या पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. यासाठी शब्द मर्यादा 400 ते 500 शब्द. कागदाच्या एकाच बाजूवर लिखान करावे. तर चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता 7 वी व 8 वी गटातील विद्यार्थ्यांसाठी जंगल जळताना पळणारे प्राणी, पशु, पक्षी व वनभोजनाचा आनंद घेणारे कुटुंब तसेच इयत्ता 9 वी व 10 वी गटातील विद्यार्थ्यांसाठी जंगलाला लागले आग विझवणारी मुले, गावकरी व जंगलातील वणव्याचे विदारक दृश्य असे विषय देण्यात आल आहेत. यापैकी कोणत्याही एक विषयावर चित्र काढून रंगवणे. चित्र काढण्यासाठी पेपर आकार नॉर्वे पेपरचा वापर करावा. दोन्ही स्पर्धेसाठी स्वतंत्र पहिले तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांसाठी 3000/-, द्वितीय 2000/-, तृतीय 1000/- व उत्तेजनार्थ 500/- रुपये तसेच शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याचबरोबर निबंध व चित्रकला 21 ते 30 जुलै दरम्यान पाठवण्याची मुदत आहे. माने-देशमुख विद्यालय पाटण येथे चित्रकला तर सौ. सुलोचनाबाई पाटकणर कन्याशाळा पाटण येथे निबंध पाठवण्याचे आहेत. अधिक माहितीसाठी चित्रकला स्पर्धेसाठी शरद घाणे मो. 9689061020 व निबंध स्पर्धेसाठी नितीन घाडगे मो. 9922275457 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्वास फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.