विजयनगर येथील ता. कराड येथील महाकाली मिल्क प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रथम दूधने गरुड भरारी घेतली आहे. गेली 15 वर्ष दुग्धव्यवसायात चिकाटीने काम केल्याने प्रथम दूध ने वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ बनवून महाराष्ट्रात आपला नावलौकिक केला असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कराड बसस्थानक लगत असणार्या भूविकास बँकेच्या गाळ्यांमध्ये प्रथम दूध शॉपी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील माजी आमदार आनंदराव पाटील, युवा नेते डॉ. अतुल भोसले, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील काका, राजेश पाटील-वाठारकर, माजी नगरसेवक महादेव पवार, नगरसेविका स्मिता हुलवान, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, मुंढे गावचे ज्येष्ठ नागरिक आनंदराव जमाले, हजारमाची गावचे उपसरपंच प्रशांत यादव, गंगाधर जाधव, रमेश लवटे, अमित पाटील, अनुज पाटील, प्रमोद शिंदे, मोहम्मद आवटे, निसार मुल्ला यांची उपस्थिती होती.
प्रथम दूध शॉपी मुळे दर्जेदार स्वादिष्ट दुग्धजन्य पदार्थ शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना प्रथम दूध शॉपी च्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकणार आहेत. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत अमित पवार यांनी केले तर आभार महेश चक्के यांनी मानले.