फलटण पूर्वभाग हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. येथील हनुमंतवाडी, गोखळी ही गावे अनुक्रमे इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणारी गावे आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी आदेश जारी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे तंतोतंत पालन करण्याचे महत्त्वपूर्ण काम संबंधित गावातील ग्रामपंचायत व कोरोना समितीने केले.
आसू : फलटण पूर्वभाग हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. येथील हनुमंतवाडी, गोखळी ही गावे अनुक्रमे इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणारी गावे आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी आदेश जारी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे तंतोतंत पालन करण्याचे महत्त्वपूर्ण काम संबंधित गावातील ग्रामपंचायत व कोरोना समितीने केले.
यामध्ये प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना सोशल डिस्टन्िंसगचे पालन करण्यास सांगणे, सॅनिटायझर व मास्कचे वितरण करणे, अर्सेनिक अल्बमचे मोफत वाटप करणे अशा प्रकारची अनेक कामे करून फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील सरपंचांनी कोरोना काळात ‘कोरोना योद्ध्या’ची भूमिका बजावली आहे.
या सरपंचांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गोखळी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे, पवारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर पवार, हनुमंतवाडीचे सरपंच विक्रमसिंह जाधव, राजाळेचे नीळकंठ निंबाळकर, आसूतील माऊली क्लिनिकचे डॉ. संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते बजरंग गावडे यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारांचे वितरण फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब मुळीक, अशोक सस्ते, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ भागवत, दै. ‘मुक्तागिरी’चे व ग्रामीण पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष आनंद पवार, अजित निकम, सुरज पवार आदींनी केले.
‘कोरोना योद्धा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारमूर्तींचे राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.