भाजपा सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील कदम यांची निवड
News By : पुसेसावळी L आशपाक बागवान

भारतीय जनता पार्टीच्या संघटात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली भाजपाचे शीर्ष केंद्रीय नेतृत्व,राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारणीशी चर्चा करून सत्तर संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड उत्तर भाजपाचे नेते,वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांची नियुक्ती केली आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून गोरेगाव (वांगी ) ता. खटाव येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या धैर्यशील कदम यांना हे महत्त्वाचे पद देऊन भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे धैर्यशील कदम यांनी स्वतः पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले असून त्यांच्या पत्नी सौ सुनीता कदम यांना खटाव पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा नियोजन मंडळ व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे काँग्रेस व शिवसेनेच्या तिकिटावर निर्णायक मिळवली होती परंतु सदर पक्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वाला पाहिजे तशी काम करण्याची संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला वाव न मिळाल्याने त्यांनी मागील वर्षी भाजपात प्रवेश केला होता अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्याने भाजपा पक्ष नेतृत्वाला प्रभावित करून सातारा जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी त्यांनी मिळविली आहे त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या प्रतिनिधिशी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले सातारा जिल्हाध्यक्ष हे महत्त्वाचे पद असून माझ्या सारख्या संघर्षातून पुढे आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष संघटन व विस्ताराची ही जबाबदारी देऊन आमचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. श्रीमंत उदयनराजे भोसले,खा.रणजित नाईक निंबाळकर,आ.जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अतुल भोसले, विक्रम पावसकर,यांचा मनःपूर्वक आभारी असून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यास पात्र राहून आमचे मतदार संघातील कराड उत्तर भाजपाचे अध्यक्ष महेश जाधव,मनोज घोरपडे,रामकृष्ण वेताळ, महेंद्र डुबल,सुरेशतात्या पाटील, सागर शिवदास यांचे सह जिल्ह्यातील सर्व भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी,अल्पसंख्याक आघाडी,सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना बरोबर घेऊन येत्या सर्व निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात भाजपा नंबर एकचा पक्ष म्हणून कसा उभा राहील यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केली.