‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासकामातून चितळीत परिवर्तन करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
मायणी : ‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासकामातून चितळीत परिवर्तन करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
चितळी, ता. खटाव येथील चांद नदीवर बांधण्यात आलेल्या 50 लाखांच्या बंधार्याचे लोकार्पण व पाणीपूजनावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक रामराव पवार, उद्योजक यशवर्धन पवार, ऋत्विक गुदगे आदी उपस्थित होते.
गुदगे म्हणाले, ‘चितळीकर ग्रामस्थांनी विकासकामासाठी कायमच पाठपुरावा केला आहे. चांद व येरळा नदीवर बंधारे झाल्याने शेतकर्यांचे चेहरे फुलल्याचे पाहून समाधान वाटत आहे. प्रत्येक कामाच्या उद्घाटनावेळी नवीन कामाचा शुभारंभ होत आहे. विकासकामे करताना ज्यांनी आपणास मतदान दिले व दिले नाही, त्यांचाही आपण प्रतिनिधी असून, विकासकामे करताना सर्वांना सोबत घेऊन गावात विकासातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार असल्याचा आपणास विश्वास आहे. शेडगेवाडी व चितळीतील शेतकर्यांनी आपणाकडे चांद नदीवर बंधारा बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूकडील शेतकर्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे.’
उद्योजक पवार म्हणाले, ‘ज्यांना विकास काय, हे माहीत नाही, त्यांनी सुरेंद्र गुदगेंनी केलेली कामे पाहून घ्यावीत. गुदगेंच्या पाठीमागे उभे राहून विकासकामांच्या गंगेत सर्वांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बंधार्यात साठलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास संपत पवार, बालाजी पवार, चंद्रकांत कदम, बाळासो पवार, कृष्णराव पवार उपस्थित होते.
प्रा. शंकरराव पवार यांनी स्वागत केले. श्रीरंग फाळके यांनी आभार मानले.